कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रेरणेतून व प्रा.डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वासाच्या जोरावर संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री हनुमंत दिगंबर मडके यांनी आपल्या रिटायरमेंट नंतर मोहेकर मल्टीस्टेट संस्थेची स्थापना २६ जून २०१२ रोजी केली. संस्थेची पहिली शाखा कळंब येथे ३० ऑगस्ट २०१२ रोजी सुरु करण्यात आली . परंतु आपल्या गावाचे नाव प्रसिद्ध व्हावे म्हणून संस्थेचे मुख्य कार्यालय मोहा या छोट्या गावात स्थापन करण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या संस्थेची स्थापना चेअरमन हनुमंत तात्या मडके यांनी केलेली आहे. व या उद्देशाने जास्तीत जास्त शाखा या ग्रामीण भागात उघडण्यात आल्या. ग्राहकांना दैवत मानून काम करणारी संस्था म्हणून ‘मोहेकर मल्टिस्टेट’ ने आपली स्वातंत्र ओळख संपूर्ण मराठवाड्यात निर्माण केली आहे.सभासदांचे प्रथम हित जोपासणारी व विश्वासास खरी उतरणारी संस्था म्हणून अल्पशा वेळेमध्ये प्रगती पथावर अली. हळू हळू संस्थेची एक एक शाखा वाढवत आज रोजी २४ शाखा झाल्या. छोटेसे लावलेले रोपटे आज मोठे वृक्षात रूपांतर झाले. अधिकाधिक ग्रामीण भागातील गरजूना बँकिंग चा लाभ घेता यावा म्हणून सर्व प्रथम २०१३ साली झिरो बॅलन्स वर खाते हि सुविधा नावारूपाला आणली.
धावत्या युगानुसार संस्थेने सभासदांच्या गरज ओळखून सतत आपल्या सेवा व सुविधा मध्ये बदल केले व आज डिजिटल क्षेत्रात एक पाऊल पुढे येत मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँक, क्यू आर कोड सुविधा, सी बी एस सॉफ्टवेअर प्रणाली, स्वतःचा IFSC Code, RTGS /NEFT /IMPS सुविधा अशा भरपूर बँकिंग सुविधा सभासदांना देण्यात आलेले आहे. तसेच अनेक उद्योगधंद्यांना, महिला / पुरुष बचत गट ला कर्ज पुरवठा व वेळोवेळी मार्दर्शन केले. संस्थेचा सुरळीत व पारदर्शक कारभार, डॉ अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत तात्या मडके, संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या प्रामाणिक प्रयतनाने आज संस्थेचे पन्नास हजारापेक्षा जास्त समाधानी सभासद यांच्यामुळे संस्थेने कमी कालावधीत नावलौकिक मिळविले आहे