सन्माननिय सभासद सस्नेह नमस्कार…
संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपणाशी सुसंवाद साधताना अत्यंत आनंद वाटतो
संस्थेच्या स्थापनेपासूनच सभासदांचे हित व सेवाभाव हा एकच ध्यास घेऊन संस्था
अविरत काम करीत आहे. सभासदांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना, व्यापारी व्यवसायिकाना, शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय म्हैस खरेदीसाठी, पोल्ट्री फार्मसाठी कर्ज वाटप केलेले आहे. तसेच व्यापाऱ्यांसाठी अल्पमुदतीचे कर्ज देऊन, माल तारण कर्ज देऊन व्यापारात वृद्धी व्हावी हा उद्देश पूर्ण केलेला आहे. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्राधान्याने महिला बचत गटांना वेगवेगळे उद्योगासाठी व व्यवसायासाठी कर्ज वाटप केलेले असून बचत गटांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. महिला सक्षमीकरण करण्यासाठी संस्थेने मोठ्या प्रमाणात कार्य केलेले आहे. यासाठी राष्ट्रीय महिला कोष दिल्ली येथील महिला अधिकाऱ्यांवर महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेत सहभागी सभासदांसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरुवात केली तसेच क्यू आर कोड सुविधा, ऑनलाइन NEFT/RTGS/IMPS इत्यादी सुविधा चालू करण्यात आले. मुलींच्या भविष्याचा विचार करता मोहेकर कन्यारत्न सारखी योजना सुरू करण्यात आली.
संस्था प्रत्येक वर्षी सामाजिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचं काम करीत राहते. मागील कोरोना अनेक प्रकारे सामाजिक कार्यमध्ये पुढाकार घेतलेला आहे. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोड निर्माण करण्याचे प्रयत्न संस्था करीत आहे. त्याचप्रमाणे गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचाऱ्यांचे सन्मान करण्यात येते. स्वच्छता जलसंधारण वृक्ष लागवड इत्यादी क्षेत्रात संस्थेने मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना व्यक्तिमत्व विकास संगणक व कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात येते. तसेच संस्थेच्या माध्यमातून एक निर्व्यसनी पिढी घडविण्याचे कार्य झालेले आहे.
अशा अनेक कामातून संस्थेने सभासद, हितचिंतक व सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व इथून पुढे असेच काम करण्याचा संस्थेचा मानस असून त्यासाठी आपण सर्व सभासदांनी संस्थेवर विश्वास दृढ करून सहकार्य करावे. त्याचप्रमाणे कोणत्याही अफवांवर कधीच विश्वास ठेवू नये. तसेच कर्जबाकी वेळेत भरणा करून संस्थेच्या आर्थिक वृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो.
हे सर्व काम पारपाडण्यासाठी सन्मानीय संचालक मंडळाचा सिंहाचा वाटा आहे.
आज संस्थेचे मुख्य कार्यालय बांधण्यासाठी मोहा येथे संस्थेच्या स्वतःच्या मालकीची ५३ गुंठे जागा घेतलेली आहे.
तसेच काळेवाडी पुणे येथे स्वतः च गाळा, कळंब येथे स्वतःची इमारत बांधून संस्था भक्कम करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकार्य व विश्वासाच्या पाठबळावर, आम्ही सदैव प्रगतीपथावर राहून सर्वाना एक चांगल्या प्रकारची बँकिंग सेवा पुरविण्याचे काम करुत, याची आम्हाला खात्री आहे.